Tractor Anudaan Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण ट्रॅक्टर अनुदान कसे मिळवायचे ? किंवा सब्सिडि कशी मिळवायची याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2024
महाराष्ट्र सरकार ही आपल्या राज्यातील शेतकरी बांधव यांच्या साथी विविध योजना राबवत असते . शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढवा याठी कृषि विभाग मार्फत ट्रॅक्टर खरेदी साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान ही देण्यात येते.
योजनेचे नाव | ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 |
विभाग | कृषि विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
महाडीबीटी या पोर्टल वरती ट्रॅक्टर अनुदान योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज भासणार आहे.
- आधार कार्ड
- सातबारा
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
वरील माहिती ही तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
- सर्वात आधी महाडीबीटी पोर्टल वरती नवीन शेतकरी नोंदणी करायचे आहे.
- नवीन शेतकरी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल कम्प्लीट करायचे आहे.
- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला किती एचपी चे ट्रॅक्टर हवे आहे ते निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे.
वरील प्रमाणे तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.
लाडकी बहीण योजना असा करा ऑनलाइन अर्ज
निवड कधी व कशी कशी होईल?
महाडीबीटी या पोर्टल वरती जेवढे अर्ज केले जातात त्या सर्व योजनांची निवड ही लॉटरी पद्धतीने विभागीय पातळी वरती करण्यात येते.
निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज चा पाठवण्यात येतो. त्यानंतर तुम्हाला पुढील सात ते आठ दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करायचे असतात.
त्यानंतर तुम्हाला कृषी अधिकारी यांची पूर्व प्रमाणे घेऊन यंत्र हे खरेदी करायचे आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होऊ शकता.