पेसा म्हणजे काय? पेसा क्षेत्र म्हणजे काय? संपूर्ण माहिती माहिती सोप्या भाषेत | Pesa Act Information Marathi

Pesa Act Information Marathi : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण पेसा म्हणजे काय? पेसा कायदा काय आहे? पेसा कायदा कधीपासून अमलात आला व कोणासाठी आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

पंचायत विस्तार ( अनुसूचित क्षेत्र ) अधिनियम 1996 ( पेसा ) हा कायदा 24 डिसेंबर 1996 रोजी अस्तित्वात आला. Panchayats Extension To Scheduled Areas याला शॉर्ट मध्ये पेसा असे म्हणतात.

पिसा कायदा हा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित आहे. आदिवासींची संस्कृती प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हा पेसा कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

पेसा कायदा व पेसा क्षेत्र काय ?
पेसा कायदा व पेसा क्षेत्र काय ?

पेसा क्षेत्र म्हणजे काय?

ज्या ठिकाणी आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लोकसंख्या जास्त आढळते. त्या क्षेत्राला पेसा क्षेत्र असे म्हणून ओळखले जाते.

पेसा हा कायदा आपल्या भारत देशांमध्ये 10 राज्यांमध्ये लागू आहे. या राज्यांची नावे खाली तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • आंध्र प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • झारखंड
  • ओडिसा
  • छत्तीसगड
  • हिमाचल प्रदेश
  • राज्यस्थान
  • तेलंगणा

वरील राज्यांमध्ये पेसा कायदा हा लागू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालील जिल्हे हे पेसा कायद्यांमध्ये मोडत आहेत.

  • अहमदनगर
  • पुणे
  • ठाणे
  • पालघर
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • जळगाव
  • अमरावती
  • यवतमाळ
  • नांदेड
  • चंद्रपूर
  • गडचिरोली

वरील जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. हा पेसा कायदा कोणत्या तालुक्यासाठी व गावासाठी लागू आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे.

पेसा भरती काय आहे?

पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी काही पदे ही राखीव ठेवलेली असतात. या पदांवर हक्क फक्त कायद्यानुसार अनुसूचित जमातीतील उमेदवार यांचा असतो. त्यामुळे पेसाभरती ही अत्यंत महत्त्वाची आहे.

या कायद्यामुळे स्थानिक उमेदवार व सुशिक्षित तरुण यांना नोकरीची संधी ही मिळत असते. यामुळे आदिवासी लोकांचा विकास होण्यास मदत ही होत असते.

अनुसूचित जमातीचा उमेदवार कोणाला म्हटले जाते?

अनुसूचित जमातीचे विद्यार्थी किंवा आई-वडील किंवा आजी-आजोबा हे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात 26 जानेवारी 1950 पूर्वीपासून राहत असतील अशा विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचा उमेदवार असे म्हटले जाते.

पेसा दाखला कुठे मिळतो?

पेसा दाखला किंवा पेसा सर्टिफिकेट हे पेसा क्षेत्रातील तहसील कार्यालयामध्ये आपले सरकार पोर्टल किंवा सेतू केंद्रामध्ये मिळत असतो.

तर अशाप्रकारे मित्रांनो आपण पेसा या कायद्याबद्दल थोडक्यात माहिती ही बघितलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही दुरुस्ती सुचवायची असेल किंवा काय प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर हा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Comment