7/12 Download Kasa Karaycha ? | नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण आपल्या मोबाईल वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला अडचणीच्या वेळी 7/ 12 कार्ड डाउनलोड कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.
आपले सरकार हे आपल्यासाठी विविध योजना राबवत असते. तर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे हे आपल्याला जमा करावे लागतात तरीही कागदपत्रे आपण मोबाईल वरून कशी काढायची याची सविस्तर माहिती आपण मराठी रायटर या पोर्टल वरती सांगत असतो. या लेखांमध्ये आपण आपल्या मोबाईल मधून सातबारा कसा डाऊनलोड करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
7/12 डाऊनलोड कसा करायचा
तर मित्रांनो सातबारा हा तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा डाऊनलोड करू शकत आहात. आणि हा सातबारा सर्वीकडे मान्य आहे सर्व सरकारी योजनांच्या अर्जासाठी हा सातबारा ग्राह्य धरण्यात येतो.
तर सातबारा कसा डाऊनलोड करायचा व ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
डॉक्युमेंट नाव | सातबारा |
शुल्क | 15 रुपये फक्त |
डाऊनलोड करण्याची पद्धत | ऑनलाईन |
डाउनलोड करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
कालावधी | तात्काळ |
तर मित्रांनो सातबारा तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसे डाउनलोड करू शकता याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
सातबारा डाऊनलोड कसा करायचा ?
सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती येऊन डिजिटल सातबारा असे सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे. ही वेबसाईट तुम्हाला खालील प्रमाणे दिसणार आहे.
त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन मी ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज भरायचा आहे.
येथे तुम्हाला नवीन युजर रजिस्ट्रेशन करायचे आहे. पहिले नाव मधले नाव आडनाव व इतर सविस्तर माहिती तुम्हाला भरून तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसणार आहे.
येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये रिचार्ज करून घ्यायचा आहे. रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज अकाउंट वरती क्लिक करून तुम्ही पंधरा रुपये ऍड करायचे आहेत. तुम्हाला जर जास्त सातबारा किंवा आठ अ उतारा डाऊनलोड करत असल्यास तुम्ही तेवढे पैसे ऍड करायचे आहेत. एक सातबारा किंवा रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये असे तुम्हाला जेवढे सातबारा किंवा आठ अ आहे डाऊनलोड करायचे आहेत तेवढे तुम्ही पैसे ऍड करायचे आहेत.
त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचा सातबारा डाऊनलोड करायचा आहे. जर सातबारा डाऊनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला लगेचच मदती करण्यात येईल. अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी किंवा डॉक्युमेंट साठी आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा.