नमस्कार मित्रांनो , रोजगार हमी मार्फत देण्यात येणाऱ्या विहीर योजनेची माहिती आपण येथ पाहणार आहोत . यासाठी ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा ? अनुदान किती मिळणार याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे .
महाराष्ट्र सरकार ही आपल्या राज्यातील गरीब शेतकरी बांधव यांच्या साथी विविध योजना राबवत असते . त्यामध्ये शेती साथी विहीर योजना अत्यंत महत्वाची योजना आहे . या योजनेमार्फत शेतकरी यांना विहीर बांधकाम करण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान ही देण्यात येते .
याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .
विहीर योजना कंगदपत्रे
विहीर योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कंगदपत्रे ही लागणार आहेत . त्याची यादी ही तुम्हाला खालील प्रमाणे उपलब्ध करून दिली आहे
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- 7/12
- जॉब कार्ड
मनरेगा अंतर्गत सामूहिक विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला 4 लाख रुपये किंवा इसटीमेट नुसार अनुदान ही देण्यात येईल .
विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 1 एकर जागा असायला हवी . अधिक माहिती पाहिजे असल्यास ग्रामसेवक याशी संपर्क करा .
अर्ज कुठे व कसा करायचा आहे
विहिरी साठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कडे अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्या नंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
शासन निर्णय या अर्जासाठीचा नमुना दिला आहे तो तुम्ही खाली बगु शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता.👇
या योजनेचा लाभ सर्व शेतकरी यांना देण्यात येतो .
अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा द्यायचा आहे. तसेच संमतीपत्राचा शासन नर्णयाप्रमाणे जोडला आहे. आणि तुम्हाला खाली लिंक दिली आहे. ती लिंक तुम्ही open करून पाहू शकता. 👇👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202211041907250616.pdf
लाभधारकाची पात्रता
** लाभधारकाच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असू नये. याची जाणीव घ्या **
१. अर्जदार यांच्याकडे किमान 1 एकर जागा हवी
२.पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 किंवा 600 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल *
३.दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
४.7/12 यावर विहीर , बोरवेल , शेततळे याची नोंद नसावी .
५.एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा असावा.
६. नरेगा मार्फत विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एकर जागा असणे आवश्यक आहे.
७.लाभार्थी यांच्याकडे जॉब कार्ड असावे.
तर मित्रांनो वरील प्रमाणे अर्ज हा तुम्हाला करायचा आहे . या योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही ग्रामपंचायत मध्ये भेट द्यायची आहे . येथे तुम्हाला सर्व माहिती ही मिळणार आहे.