Ladki Bahin Yojana Update लाडकी बहीण योजना अपडेट: नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. लाडके बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे हे सुरू झालेले आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाईट व ॲप हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Update
महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील स्त्रियांसाठी विविध योजना राबवत असते. यामध्ये लाडक्या बहिणीसाठी प्रति महिन्याला 1500 रुपये हे देण्यात येणार आहेत.
याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
योजनेचे नाव | लाडकी बहीण योजना |
वेबसाइट लिंक | येथे क्लिक करा |
app लिंक | येथे क्लिक करा |
अंतिम दिनांक | 31 ऑगस्ट 2024 |
येथे करा ऑनलाईन अर्ज
लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज हे वेबसाईट वरती स्वीकारणे सुरू केलेले आहे. वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा पंधरा वर्षे पूर्वीचे मतदान कार्ड रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे
- रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला
- बँक पासबुक
- हमीपत्र
- आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज आहे लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. ऑनलाइन अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा नक्कीच तुम्हाला मदती करण्यात येईल.
किंवा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज हा करून देऊ . त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ला तुमची कागदपत्रे ही पाठवायचे आहेत.
अर्ज मंजूर कधी होतात | Ladki Bahin Yojana Update
अर्ज केल्यानंतर तुमचे अर्ज हे ग्रामपंचायत स्तरावर रिव्ह्यू केले जातात आणि त्यानंतर तुमचे अर्ज पडताळणी क रून मंजूर केले जातात.
जर तुम्हाला तुमची स्टेटस अप्रू असे आले तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. इन रिव्ह्यू असे जर स्टेटस दिसत असेल तर तुमचा अर्ज हा रिव्ह्यू मध्ये आहे म्हणजे त्याची पडताळणी सुरू आहे.
अर्ज रिजेक्ट झाला असल्यास तुम्ही पुन्हा नव्याने भरायचा. Ladki Bahin Yojana Update
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज अप्रू झाला की रिजेक्ट झाला हे तपासून शकणार आहात.